
हिंजवडीत प्रियकराने केली २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या; रात्रभर मृतदेहाशेजारी बसून राहिला आरोपी
हिंजवडीत प्रेमसंबंधातून झालेल्या वादाचा भयंकर शेवट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २७ वर्षीय कोमल डहाके या सॉफ्टवेअर इंजिनिअरची तिच्याच प्रियकराने मारहाण करून हत्या केल्याचा आरोप आहे. कोमल विप्रो कंपनीत, तर आरोपी शुभम काळबांडे इन्फोसिसमध्ये काम करत होता. दोघांचे गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, मागील काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. रविवारी रात्री झालेल्या वादानंतर कोमलचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हत्येनंतर आरोपी रात्रभर मृतदेहाशेजारी बसून राहिल्याची माहिती समोर आली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा