मराठी रोखठोक न्युज

(सर्व सामान्यांचा आवाज)

खोट्या चालन’च्या सायबर जाळ्यात अडकू नका.


कोल्हापूर (२५ नोव्हेंबर) – ‘तुमच्या वाहनाचे चालन थकबाकी आहे, ताबडतोब भरा’ असा एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप मेसेज आला, तर क्षणभरही न थांबता सावध व्हा! सायबर भामट्यांनी आता थेट ई-चालनच्या नावाखाली वाहनचालक आणि नागरिकांना लुटण्याचा नवा डाव रचला असून, या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांना कडक इशारा आणि आवाहन केले आहे.

मेसेजमधील कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका किंवा कोणतीही एपीके (APK) फाईल व अॅप डाउनलोड करू नका, अन्यथा तुमचा मोबाईल हॅक होऊन मोठा आर्थिक फटका बसू शकतो. तसेच ओटीपी, यूपीआय पिन, कार्ड डिटेल्स किंवा कोणतीही बँक माहिती कोणालाही देऊ नका आणि चालन भरण्यासाठी आलेल्या संशयास्पद नंबर वा वेबसाईटवर अजिबात विश्वास ठेवू नका.

प्रतिक्रिया व्यक्त करा