
आता आठवड्यातून दोनदा स्वच्छता आणि कायमस्वरूपी कचराकुंडीची मागणी
लोणंद : मुस्लिम समाजाच्या पवित्र दफनभूमीतील अस्वच्छतेचा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते तथा मुस्लिम जमाअतचे विश्वस्त कय्युम मुल्ला यांनी ठामपणे मांडल्यानंतर लोणंद नगरपंचायत प्रशासनाने अवघ्या दोन दिवसांत दखल घेत दफनभूमीतील साचलेला कचरा उचलला. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या स्वच्छतेच्या प्रश्नाला अखेर दिलासा मिळाला आहे. सदर समस्या निवारण होणेबाबाबत ठेकेदार यांचे सुपरवायझर मोहन बोडरे यांनी स्वतः उभे राहुन कामकाज करुन घेतले
याबाबत कय्युम मुल्ला यांनी नगरपंचायत प्रशासनाचे आभार मानले असून, दफनभूमीची स्वच्छता केवळ एकदाच न करता आठवड्यातून किमान दोन वेळा घंटागाडी व सफाई कर्मचारी पाठवावेत, तसेच कायमस्वरूपी कचराकुंडी ठेवावी, अशी मागणी केली आहे.
प्रशासनाने दाखवलेली तत्परता स्वागतार्ह असून, यापुढेही दफनभूमीचे पावित्र्य आणि स्वच्छता अबाधित राखण्यासाठी नियमित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा कय्युम मुल्ला यांनी व्यक्त केली.
श्री. दिलीप वाघमारे यांजकडून, मुख्य संपादक = शौकत शेख.
प्रतिक्रिया व्यक्त करा