
नवी दिल्ली : मामाच्या मुलीशी म्हणजेच मामेबहीणीशी विवाह करण्याच्या प्रवेबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. जवळच्या रक्ताच्या नात्यातील विवाहां वर कायदेशीर निर्बंध आणण्याचा विचार करण्याची सूचना केंद्र सरकारला करण्यात आली आहे.
२० नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या विषयावरील जनहित याचिकेची सुनावणी झाली. बेंगळुरू येथील चार्वी एस. या २० वर्षीय कायद्याच्या विद्यार्थिनीने ही याचिका दाखल केली आहे.
जवळच्या नात्यातील विवाहांमुळे पुढील पिढीतील मुलांना आनुवंशिक आजारांचा धोका वाढू शकतो, असा मुद्दा याचिकेत मांडण्यात आला आहे.
न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून अशा विवाहांबाबत योग्य कायदेशीर तरतुदी करण्याची आवश्यकता आहे का, याचा विचार करण्यास सांगितले. तसेच शाळा-महाविद्यालयांः मधून जनजागृती करून लोकांना आरोग्यविषयक माहिती देण्याची सूचनाही केली.
प्रतिक्रिया व्यक्त करा